Mumbai Ravan Video: लोकांना हेल्मेट घालण्याबाबत जागरूक करण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) वेळोवेळी नवनवीन काम करत असतात. यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावरही मुंबई पोलिसांनी काही नवीन पद्धतीने लोकांना जागरूक करण्याचं केलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dasara) पोलिसांनी यासाठी थेट रावणाची मदत घेतली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसत आहे.


काय आहे हा Video ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रामवर (Mumbai Police Instagram) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रावणाच्या भूमिकेत एक माणूस दिसत आहे. विजयादशमीच्या दिवशी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रावण घरातून बाहेर पडत बुलेटवर जाताना (Ravan riding a bike in mumbai) दिसत आहे. त्याच्या 10 तोंडांमुळे त्याला घरातून बाहेर निघताना देखील अडचण होते. सिग्नलकडे जाताना रावणाला एक माणूस भेटतो जो हेल्मेटशिवाय (Road shefty Helmet) गाडी चालवताना दिसतो. हेल्मेट न घालता त्यानं ते गाडीत लटकवलं आहे.


रावण त्या व्यक्तीला इशाऱ्याने हेलमेट घालण्याचा सल्ला देतो. हेल्मेट का घालत नाही असं विचारतो. तो माणूस इशारा देत उत्तर देतो की, अहो काही गरज नाही. यानंतर रावणाने विचारलं की अरे मुर्खा, मला 10 तोंड आहे, तुझे किती आहेत? हे ऐकून त्या व्यक्तीचा चेहरा पडतो आणि आपल्याला एकच डोकं असल्याची जाणीव व्यक्तीला होते.


आणखी वाचा - T20 World Cup : जगातील Best Opener कोण? वॉर्नरने स्वत:चं नाही तर 'या' भारतीय खेळाडूचं नाव घेतलं!


 


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, मुंबई पोलिस अनेकदा मोठ्या सणांच्या दिवशी असे व्हिडिओ शेअर (Mumbai police share video) करत असतात. यापूर्वीही अनेकदा काही मजेदार व्हिडिओ बनवून लोकांना जागरूक केलं जातं. भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकीचे अपघात होतात. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे.