मुंबई : मुंबई पोलिसा आपल्या ट्विट्समुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. मुंबई पोलिसांच्या ट्विट्सला सोशल मीडिया युझर्स आणि खास करून तरूणाईने अधिक पसंत केले आहेत. रस्ते सुरक्षा आणि अपघाताची माहिती देण्याकरता मुंबई पोलिस कायम सिनेमा, सेलिब्रिटी आणि ट्रेंडिग टॉपिकची मदत घेतात. आणि हटके पद्धतीने संदेश देतात. आता मुंबई पोलिसांच्या मदतीला चक्क टॉम क्रूझ धावून आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉम क्रूझचा सिनेमा मिशन इम्पॉसिबल फॉलाऊट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाची ओपनिंग जवळपास 59 मिलिअन डॉलर राहिली आहे. सिनेमातील स्टंट्स प्रेक्षकांना अतिशय आवडले आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी सिनेमांतील स्टंटचा अगदी योग्य वापर केला आहे. 



या सिनेमांत एक सीन आहे जिथे टॉम क्रूझ हेल्मेट न घालता अतिशय वेगाने मोटारबाइक चालवत आहे. याच दरम्यान मोटारबाइकवरील त्याचा कंट्रोल सुटला आणि दुर्घटना होते. या सिनची क्लिप शेअर करून मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक महत्वाचा संदेश दिला आहे. 


जर मुंबईच्या रस्त्यावर अशा प्रकारचे स्टंट करताना दिसले तर त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. आमच्याकडून इम्पॉसिबल मिशन होणार नाही. हे आमचं काम आहे. या संदेशसोबत त्यांनी हॅशटॅगमध्ये सुरक्षा शक्य आहे. हॅल्मेटचा वापर करा. गाडी चालवण्याच्यावेळी घाई करू नका.