मुंबई :  मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) उद्घाटनाआधी राजकारण राजकारण चांगलच तापलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चं उदघाटन होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची पोस्टरबाजी
पण मुंबईतील मेट्रोच्या उद्घाटनाआधी राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. उद्घाटनाआधी भाजपनं (BJP) मुंबईत पोस्टरबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे फोटो पोस्टवर दिसत आहेत. 'काम केलंय, मुंबईने पाहिलंय, धन्यवाद देवेंद्रजी' अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले आहेत. 


ठाकरे सरकारवर टीका
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आयत्या पिठावर रेघोट्या आहेत अशी टीका भाजपने केली आहे. या प्रकल्पाचं 60 टक्क्यांहून अधिक काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पूर्ण झालं आहे. पण यानंतरही उर्वरित कामासाठी तब्बल तीन वर्ष विलंब लावण्यात आला. यासाठी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली आहे. 


फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांची गुढी उभारण्यासाठी पुढे येऊन ठाकरे सरकारने आपला नाकर्तेपणा सिद्ध केला आहे, असा आरोपही भाजपने केला आहे. 


कसा आहे प्रकल्प
मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे. या मार्गावर पहिल्या टप्प्यात 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरु होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्ग सुरु करण्यात येणार आहे.  मुंबई ‘मेट्रो 7’ च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत. पण काही मेट्रो स्थानकावरील कामं अद्याप अपूर्ण आहेत.