Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 2 महिला माजी महापौरांसह ठाकरे गटाचे डझनभर माजी नगरसेवक (Corporator) शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर असल्याचं समजतंय. इतर 7 नगरसेवकांसोबत प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  तेव्हा त्या दोन माजी महापौर (Former Mayor) कोण यावर आता चर्चा रंगतेय. राज्यातल्या सत्तांतरानंतर मुंबईत फक्त पाचच नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. मात्र अजून 92 नगरसेवक ठाकरेंसोबत आहेत. शिवसेनेची (Shivsena) मोट बांधण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरलेत. याचवेळी ठाकरे गटाला सुरुंग लावण्याची तयारी शिंदे गटाने पूर्ण केल्याचं समजतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंचे नगरसेवक शिंदे गटात? 
शिंदे गटात जाणाऱ्यांमध्ये 2 महिला माजी महापौरांचा समावेश आहे. तर 7 नगरसेवकांची शिंदे गटासोबत प्राथमिक चर्चा आहे. महापालिकेची निवडणूक घोषित होताच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय ज्येष्ठ माजी नगरसेविका भाजपमध्ये जाण्यास इच्छूक होत्या, पण त्यांनाही शिंदे गटात जाण्याचा सल्ला भाजपनं दिलाय


महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला फटका?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात मोठं इनकमिंग झालं तर महापालिकेत सत्तांतर अटळ असल्याचं संख्याबळावरुन दिसतंय. ठाकरेंच्या 92 शिलेदारांना सुरुंग लावण्याची रणनीती शिंदेंनी आखलीय. मुंबई महापालिकेवरचा ठाकरे गटाचा झेंडा उतरवण्याबरोबरच मुंबई म्हणजे ठाकरे हा शिक्काच पुसण्याचा शिंदेंचा मनसुबा आहे. 


ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार?
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. शहर आणि ग्रामीण भागातील 59 पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यात विभागप्रमुख, शाखा प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या फटाके फोडण्याच्या भाषेवर टीका केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी ठाकरे गटाला शिंदेंनी धक्का दिलाय. 


निलम गोऱ्हे यांचा सल्ला
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाचे कान टोचलेत. ठाकरे गटातून लोकं पक्ष सोडून जात असतील तर बदल गरजेचा आहे. कुठे कमी पडत असू तर बदल झाले पाहिजेत अशी कबुली नीलम गोऱ्हेंनी दिलीय. ठाकरे गट कोणी सोडू नये म्हणून प्रयत्न करणार असं आश्वासनही नीलम गोऱ्हेंनी दिलंय.