मुंबई : मुंबईतल्या आयआयटी पवईतल्या विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेंटचं सत्र सुरु झालं आहे. पहिल्या दिवशी 34 कंपन्यांनी यात सहभाग घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनईसी जपान, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांनी परदेशातल्या नोकरीसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. तर आयबीएम, टाटा स्टील आणि इतर कंपन्यांनी देशांतर्गत नोक-यांसाठी विद्यार्थ्यांची चाचपणी केली.


त्याचवेळी इस्रो आणि बीपीसीएल या सरकारी उपक्रमांनी 13 विद्यार्थ्यांची निवड केली. अशा प्रकारे पहिल्या दिवशी दिडशेहून अधिक विद्यार्थ्यांची निवड विविध कंपन्यांतल्या नोक-यांसाठी करण्यात आली.