मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद
बंदच्या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलच्या मागे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कमान बसविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आज दुपारी दुपारी बारा ते दोन या काळात मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खालापूर टोल- खालापूर गाव- खालापूर फाटा-मार्गे चौक फाटा- दौंड फाटा- शेडूंग टोल, अजिवळी फाटा आणि त्यानंतर परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ही वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच बंदच्या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलच्या मागे थांबवून ठेवण्यात येणार आहे.