Mumbai Pune ExpressWay: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 8 नोव्हेंबर रोजी द्रुतगती मार्गावर 1 तासाचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय. हा ब्लॉक दोन्ही दिशांना वेगवेगळ्या वेळी 30 मिनिटांसाठी असेल. त्यामुळे तुम्ही आज या एक्सप्रेसवेवरुन प्रवास करणार असाल, तर ब्लॉकबद्दल नक्की जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स्प्रेस वे हा मुंबई आणि पुणे दरम्यानचा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईहून पुण्याला दररोज मोठ्या संख्येने लोक ये-जा करतात. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ढेकू गावाजवळ वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (TMS) उपकरणे बसवण्याचे काम केले जाणार आहे. या काळात पुणे ते मुंबई हा महामार्ग दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे हा महामार्ग दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


दुपारी 3 नंतर महामार्ग पुन्हा वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. गॅन्ट्री बसवताना, पुणे वाहिनीवरील सर्व वाहतूक खालापूर टोल नाका तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे बंद असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटपासून जुना हायवे शिंगरोबा घाट ते मॅजिक पॉइंट एक्स्प्रेस वेकडे वळवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी हा मार्ग टाळण्याचा सल्ला एमएसआरडीसीने दिला आहे.