मुंबई : मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावर रविवारी २८ एप्रिलला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या विविध कामांनिमित्त उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.


मध्य रेल्वे जलद मार्गावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवर  मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर २८ एप्रिल सकाळी ११.१५ वाजता ते दुपारी ३.४५ वाजता मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर ब्लॉक असल्याने लोकल गाड्या दिवा ते परळदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. लोकल गाड्या वीस मिनिटे उशिराने धावतील.


हार्बर मार्गावर


हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजता ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


पश्चिम रेल्वे


पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.४५ वाजता ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे सांताक्रूझ ते बोरिवलीदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.