मुंबई : मुंबईच्या विलेपार्लेतील साठ्ये कॉलेच्या माध्यम महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा माध्यम महोत्सव हा संगीत या थीमवर असणार आहे. १८, १९ आणि २० डिसेंबर अशा ३ दिवस हा महोत्सव चालेल. या महोत्सवात १६ वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘जिम साँग’ आणि ‘TikTok’ च्या धर्तीवर आधारीत सादरीकरण अशा अनोख्या स्पर्धांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महोत्सवात मुंबईतील ६० महाविद्यालयांना सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले जाणार आहे. वेगवेगळ्या कॉलेजबरोबरच सर्वसामान्य संगीतप्रेमींनाही महोत्सवात सहभागी करून घेता यावे यासाठी काही स्पर्धा या सगळ्यांसाठी खुल्या ठेवण्यात येणार आहेत.


साठ्ये कॉलेजच्या बीएमएम विभागातर्फे पत्रकार परिषद घेऊन माध्यम महोत्सवाची घोषणा करण्यात आली. साठ्ये कॉलेजमधून पत्रकारिता विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार परिषद कशी आयोजित केली जाते आणि ती कशी असते, याचा अनुभव मिळावा आणि माध्यम महोत्सवाची माहिती मिळावी यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत माध्यम महोत्सवाची गेल्या सात वर्षातील पार्श्वभूमी सांगण्यात आली.