Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एका उच्चभ्रू रहिवासी इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. घाटकोपर पूर्वेकडच्या कुकरेजा पॅलेलमध्ये दीपक शाह आणि टीना शाहे हे दाम्पत्य राहातं. 7 मार्चला दीपक आणि टीना धुळवड खेळून दुपारच्या सुमारास घरी आले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मार्चला मोलकरीण घर कामासाठी आली. पण घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे तीने दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताच प्रतिसाज आला नाही. (Couple Found Dead in Bathroom)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट मोलकरणीने शेजारच्यांच्या निदर्शनास आणून दिली तसंच दीपक आणि टीनाच्या नातेवाईकांनाही कळवण्यात आलं. शाहा दाम्पत्याच्या घराची एक चावी शेजारी राहणाऱ्यांकडे होती, त्यांनी चावीच्या मदतीने दरवाजा उघडला. मात्र घरात प्रवेश करतात त्यांना धक्का बसला. दीपक आणि टीना शॉवरखाली निपचित पडलेले होते. बाथरुमचा शॉवरही सुरुच होता. घटनेची माहिती पंतनगर (Ghatkopar Pant Nagar) पोलिसांना देण्यात आली. दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. 


मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे दीपक आणि टीनाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे. 


दीपक शहा यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. त्यांना अपत्य नव्हतं. घाटकोपरच्या कुकरेजा इमारतीत ते गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. गॅस गिझर लीक झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान गॅस लीक झाल्यामुळे दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची गेल्या चोवीस तासातली ही दुसरी घटना आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. 


गाझियाबादमध्येही दाम्पत्याचा मृत्यू
गाझियाबादमध्ये (Gaziabad) मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचं नाव दीपक आणि शिल्पी असं होतं. गाझियाबादमधल्या मुरादनगर इथल्या अग्रसेन विहार इथे ते राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळवड खेळून आल्यानंतर दीपक आणि शिल्पी आपल्या घरी आले. बाथरुममध्ये आंघोळ करत असताना गॅस गिझर लीक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.


बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांच्या मुलांनी बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी दोघही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. मुलांनी पोलिसांना ही माहिती दिली. दाम्पत्याला गाझियाबादमधल्या एका खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आलं, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.