मुंबई : सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी आजपासून पुन्हा बंद करण्याता आला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सायन उड्डाणपुलाचे ६४ बेअरिंग यशस्वीरित्या बसवण्यात आले  होते. आज, शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेल्या तिसऱ्या ब्लॉकमध्ये एकूण १६ बेअरिंग बदलण्यात येणार आहेत. या कामासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील काही पूल धोकादायक झाले आहेत. तर काहींचा मेंटेन्सस करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सानय पुलाचे बेअरिंग बदलण्यात येत आहे या कामासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार उड्डाणपुलाच्या बळकटीकरणासाठी १६० बेअरिंग बदलणे गरजेचे होते. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे. 


शहरवासीयांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने  बेअरिंगचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे हे काम जवळपास चार दिवस चालणार आहे. त्यामुळे सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी ९ मार्चपर्यंत बंद राहणार आहे. 


0