एलफिन्स्टन दुर्घटना : रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
मुंबई : एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या मुंजरीसाठी तुम्हाला लोकांचे बळी हवे होते का, अशी तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या रेल्वे पुलासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तात्काळ साडेनऊ कोटींचा निधी मंजूर केलाय. ९ नोव्हेंबर रोजी या पुलाच्या कामाची निविदा उघडण्यात येणार आहे. या घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे.