रविवारी 15 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, `या` वेळेत धावतील गाड्या
Mumbai Railway Megablock : मुंबईत रविवारी घटस्थापनेच्या दिवशी मेगाब्लॉक आहे. भाविकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घ्या.
Mumbai Railway Time Table : मुंबईत मध्य रेल्वे विभागाचा रविवार दि. १५.१०.२०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लाॉक असणार आहे. ५व्या आणि ६व्या मार्गासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक चालवणार आहे. ठाणे-कल्याण ५व्या आणि ६व्या मार्गावर मध्यरात्री ०१.०० ते ०४.०० पर्यंत असणार आहेत.
अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.
गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ०४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता मेगाब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.
गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८ ) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पनवेल उपनगरी यार्ड रीमॉडेलिंगचे काम
आज रात्री १३/१४.१०.२०२३ (शुक्रवार/शनिवारी रात्री) नंतर रात्रीचे स्टेबलिंग/स्टार्टिंग वेळापत्रकानुसार केले जाईल. सर्व १२ रेक पनवेल येथे थांबवल्या जातील हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सामान्य वेळापत्रकानुसार चालतील.
घटस्थापनेच्या दिवशी मेगाब्लॉक
15 ऑक्टोबर 2023 रोजी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवशी भाविक देवीच्या लक्ष्मीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडणार असतील तर आधी मेगाब्लॉकची माहिती घेणे गरजेचे आहे. अन्यथा भाविक प्रवाशांटे हाल होऊ शकतात.