Mumbai Sunday Megablock : मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा. कारण रेल्वे रुळ आणि त्यांच्या देखभाल आणि सिग्नल यंत्रणा यांचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. (Mumbai Local Mega Block News in Marathi)


मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने  गंतव्यस्थानी पोहोचतील.


कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.  


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 


पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.5 ते सायंकाळी 4.5 पर्यंत (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून) मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49  वाजेपर्यंत  सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
पनवेल येथून सकाळी 11.2 ते दुपारी 3.53वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


मुंबई - वाशी विशेष लोकल 


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी - नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. तसेच बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.


 पश्चिम रेल्वेचा 5 तासांचा जम्बोब्लॉक


2 एप्रिल 2023 रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक असणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवार, 2 एप्रिल, 2023 रोजी अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 10.35 ते 15.35 तासांपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक पाळणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येतील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील, असे कळविण्यात आले आहे.