Mumbai TISS student Dead: मुंबईतील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीसमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी रविवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. तो भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. येथे त्याचा मृतदेह आढळला. या मुलासोबत रॅगिंग झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.  अनुराग जयस्वाल असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. 


रात्री मित्रांसोबत पार्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत अनुराग जैस्वाल हा टीसच्या मानव संसाधन कार्यक्रम म्हणजेच ह्यूमन रिसोर्सचा भाग होता.अनुराग जयस्वाल आदल्या रात्री वाशी येथे आपल्या मित्रांसह एका पार्टीत गेला होते. येथे तो आणि त्याचे मित्र मद्यधुंद होते, अशी माहिती समोर आली आहे. रात्री झोपलेला अनुराग हा सकाळी जागा झालाच नाही. त्याला सकाळी जागच न आल्याने मित्रांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी अनुरागला चेंबूर येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात नेले. तेथे पोहोचल्यावर अनुरागला मृत घोषित करण्यात आले.अनुरागच्या सर्व मित्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.


टीसकडून ट्वीट


दरम्यान टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने अनुरागच्या मृत्यू संदर्भात ट्वीट केले आहे.  एक्सवरील एका पोस्टमध्ये संस्थेने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना अनुरागच्या कुटुंबीयांसोबत नेहमी असेल असे त्यांनी म्हटलंय. 'आम्ही TISS मुंबईच्या HRM आणि LR चे प्रथम वर्षाचे विद्यार्थी,अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने अनुराग जैस्वाल यांचे निधन झाल्याची घोषणा करत आहोत. या हृदयद्रावक प्रसंगी आम्ही अनुरागच्या कुटुंबासोबत आहोत. आमचे विचार आणि प्रार्थना नेहमीच अनुरागच्या कुटुंबासोबत असतील,' असे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.