मुंबई : कोरोनाचा (Mumbai Corona) प्रसार झपाट्याने वाढतोय. दररोज मुंबईतील रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत  4 हजार 500 रुग्ण अधिक आढळले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 15 हजार 166 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मंगळवारी हीच रुग्णसंख्या 10  हजार 860 इतकी होती. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईने लॉकडाऊनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय .(mumbai today 5 january 2022 corona update 15 thousand 166 positive patients found mayor kishori pednekar lockdown)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसभरात कोरोनामुळे एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर 714 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा 89 दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर हा एक टक्क्याने अधिक 90 टक्के इतका आहे. 


मुंबईत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर


एका दिवसात 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास मुंबईत लॉकडाऊन करावा लागेल, अस संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील आकडा नियंत्रणात आला नाही, तर महापौरांनी दिलेल्या संकेतानुसार मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागेल. त्यामुळे आता मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही, हे येत्या काही दिवसातील रुग्णसंख्येवर अवलंबून असणार आहे.