मुंबईतील नव्या सी लिंकवरुन प्रवास करताना कारवर फास्टॅगची गरज नाही; असा होणार टोल कट
Mumbai Trans Harbour Link: समुद्रात उभारल्या जाणाऱ्या पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हा पुल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
Mumbai Trans Harbour Link: मुंबईत 70 च्या दशकात सुरुवातीच्या काळात लोकनेते आणि प्रशासनाने मुंबईला नवी मुंबईलो जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, तो काही लगेच आमलात आणला गेला नाही. अनेक वर्ष लोटली, सरकार बदलत गेले पण आता ही पुल प्रत्यक्षात तयार होतोय. 2018 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. कामाला गती मिळाली आणि आता पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवडी न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक पुल येत्या दोन महिन्यात जनतेसाठी खुला होणार आहे. 50 वर्षांचे स्वप्न अखेर आता साकार होत आहे. समुद्रात तयार होणारा हा भारतातील सर्वात लांबीचा पुल आहे.
शिवडी-न्हावा सेवा ट्रान्स हार्बर लिंक पुलावरुन (MTHL) धावणाऱ्या वाहनांवर चालकांना आता कारवर फास्टॅग चिटकवण्याची गरज नाहीये. वाहन चालकाच्या खिशात किंवा कारमध्ये ठेवलेल्या फास्टॅगला स्कॅन करण्यासाठी एमटीएचएलवर हायटेक कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या तंत्रज्ञानामुळं फक्त विदेशातच अशाप्रकारे टोल वसुल केला जातो. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) पहिल्यांदा या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एमटीएचएलवर बसवल्या जाणाऱ्या टोलनाक्यांवर आधुनिक पद्धतीने टोल वसुलीसाठी हायटेक कॅमेरा लावण्यात येणार आहेत. त्यासाठी तयारीदेखील करण्यात आली आहे.
एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांची ये-जा सुरिक्षित ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. वेगवान वाहनात किंवा चालकाच्या खिशात ठेवलेला फास्टॅग स्कॅन करण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे बसवले जातील. या तंत्रज्ञानामुळे एमटीएचएलवरुन धावणाऱ्या वाहनांच्या काचांवर फास्टॅग चिकटवण्याची गरज भासणार नाही. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान 22 किमीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. या पुलावर ओपन रोड टोलिंग यंत्रणा बसविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे
एमटीएचएलच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा ओपन रोड टोल सिस्टिम सुरु करण्यात येत आहे. मुंबईच्या शिवडी, नवी मुंबईमध्ये शिवाजी नगर आणि रायगड जिल्ह्यातील चिरलेमध्ये एमटीएचएचली एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स असणार आहेत. एमटीएचएलवर टोल वसुलीमध्ये गती येण्यासाठी 21 लेनमध्ये टोलसुविधा असणार आहे. यात गव्हाणपाडामध्ये 15 लेन आणि शिवाजी नगरमध्ये 6 लेनवर ही सुविधा असणार आहे. ओपन रोड टोलिंग सिस्टमअंतर्गंत एमटीएचएलवर प्रवेश करताच फास्टॅग स्टीकरवरुन टोलची रक्कम कट होणार आहे. फास्टॅग स्टिकर्सशिवाय वाहने न थांबवता टोल वसूल करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. फास्टॅग सुविधेशिवाय वाहनचालकांकडून टोल वसूल करण्यासाठी परिवहन विभागासोबत हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.