`कणेकरांचे लिखाण कधीच कोमेजून जाणारे नाही`
...
मुंबई: ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरमध्ये शनिवारी पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थीती होती. या वेळी दोघांनी शिरीष कणेकरांच्या लेखन शैलीची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
या वेळी बोलताना कणेकर साखर वाटणारा माणूस आहे. फिल्मबाजी आणि फटकेबाजी करणारे बाजीरावसुद्धा आहेत. आयुष्यात आगीमध्ये तेल ओतणारे खूप, पण आनंदाचे वंगण घालणारे केवळ कणेकर. त्यांचे लिखाण कधीच कोमेजून जाणारे नाही. शब्दांची जोडणी रक्तात असावी लागते.
कणेकरांनी ७५ रन्स फटकेबाजीने केल्यात आणि तुमच्या शंभरीची सगळ्यांना उत्सुकता आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कणेकरांविषयी आपल्य भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास मिश्कील शैलीत केलेल्या कोट्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.