Mumbai Metro 11: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व अरामदायी व्हावा यासाठी शहरात व उपनगरात मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात मुंबई मेट्रो 3 सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता मुंबई मेट्रो 11बाबत नवीन अपडेट समोर येत आहे. वडाळा आणि सीएसएमटीला जोडणाऱ्या या मेट्रोच्या मार्गात बदल करण्यात येत आहे. हा नवीन मार्ग भायखळा, फोर्ट, गेटवे ऑफ इंडियासह दक्षिण मुंबईतील काही महत्त्वाचे व गजबजणाऱ्या मार्गांवर धावणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मेट्रो 3 आणि 11 हे एमएमआरडीएचे महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग भूमिगत आहेत. पूर्व आणि पश्चिम समुद्र किनाऱ्यांना उत्तर-दक्षिण भागांना जोडणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 16,00 कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे. मेट्रो 11 हा प्रकल्प16 किमीचा असून येत्या पाच वर्षात पूर्ण होईल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड(एमएमआरसीएल) या प्रकल्पाची बांधणी करत आहेत. तर, 2030पर्यंत मेट्रो 11चा हा मार्ग सुरू होणार आहे. 


एमएमआरसीएलच्या माहितीनुसार,  स्थानिकांच्या सेवेसाठी मुळ योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनच्या पूर्व भागात फक्त वडाळा आणि सीएसएमटीला जोडण्याऐवजी मेट्रो 11 आता थोडी पश्चिमेकडून रेल्वेमार्गाच्या खालून धावणार आहे. या प्रस्तावित योजनेत सीएसएमटी आणि मेट्रो 3 येथील उपनगरीय रेल्वे मार्गावरील इंटरचेंजाही समावेश आहे. 


मेट्रो 11 प्रकल्प एकदा सुरू झाल्यानंतर भायखळा-सीएसएमटी-बॅलार्ड पियर-कुलाबा हा भाग बस आणि टॅक्सीवर अवलंबून राहणार नाही. त्यामुळं वाहतुककोंडीतून प्रवाशांची सुटका होईल आणि मेट्रोमुळं प्रवासही सोप्पा होणार आहे. तर, वडाळा हा मेट्रो11 चा उत्तरेकडील शेवटचे टोक असणार आहे. नव्या अराखड्यानुसार मेट्रो मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीनरुन दक्षिणेकडे येईल. त्यानंतर रे रोडवरुन आसपासच्या पश्चिम भागातून फिरुन भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार आणि क्रॉफर्ड मार्केट या सर्वात लगबगीच्या परिसरातून जाईल. त्यानंतर हा मार्ग अखेरीस रीगल सिनेमा येथील श्यामा प्रसाद मुखर्जी चौकातील दक्षिण टर्मिनसपर्यंत पोहोचेल.  


वडाळा-सीएसएमटी मेट्रो 11 प्रकल्प राज्य सरकारने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे सोपावला आहे. मेट्रो 11 हा प्रकल्प 4 A गायमुख-कासारवडवली आणि मेट्रो 4 कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या दोन मेट्रो मार्गांचा विस्तारीत प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळं मध्य आणि हार्बर मार्गावरील गर्दी कमी होण्यात मदत मिळणार आहे. तसंच, मेट्रो 11 प्रकल्पाची मेट्रो 3 आणि मध्य रेल्वेवर इंटरकनेक्टिव्हिटी असणार आहे.