मुंबई विद्यापीठाची तिसरी मुदतही टळण्याची चिन्हे
मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या अनेक परीक्षांचे निकाल अजूनही प्रलंबित असून, त्यासाठी विद्यापीठाला देण्यात आलेली तिसरी मुदतही टळणार, अशी चिन्हं दिसतायत.
मुंबई : मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या अनेक परीक्षांचे निकाल अजूनही प्रलंबित असून, त्यासाठी विद्यापीठाला देण्यात आलेली तिसरी मुदतही टळणार, अशी चिन्हं दिसतायत.
उद्या 15 ऑगस्टपर्यंत निकाल लावले जातील, असं आश्वासन मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलं होतं. मात्र या मुदतीतही उर्वरित 147 अभ्यासक्रमांचे निकाल लागणं जवळपास अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
यामुळे मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. मुंबई विदयापीठाच्या इतर परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असले तर विद्यार्थ्यांना देण्यात मार्कांमध्ये मोठा घोळ झालाय.