मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय.
मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय.
त्या खालोखाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मतदार नोंदणी केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे गेल्या निवडणुकीत 10 पैकी 8 जागा जिंकत विद्यापीठावर भगवा फडकवलेली युवा सेना यंदा अन्य विध्यार्थी संघटनांना 10 पैकी 10 जागांवर धोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत 2 जागा जिंकलेल्या मनसेच्या विद्यार्थी सेनेनं यंदा अचानक माघार घेतलीय. युवा सेनेच्या तुलनेत मनसेच्या विद्यार्थी सेनेची अत्यंत कमी मतदार नोंदणी झालीय. त्यामुळे सततच्या पराभावात आणखी एक पराभवाची नामुष्की नको यासाठी अधिसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षांतर्गत घेण्यात आला.
तरीही पक्षात या निर्णयाविरोधात बंडखोरी झालीय. मनसेचे दोन उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत, तर पक्षाचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी मागे घेतलीय. विद्यापीठाने जाहीर केलेल्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. आपाआपले नोंदणी केलेले जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी केंद्रावर नेण्यावर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा भर असेल. त्यांनतर 28 तारखेला मतमोजणी होणार आहे.