मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेदरम्यान आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक मिळाली मात्र लॉग इन होत नसल्याने परीक्षा देता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेत अनेक  विद्यार्थ्याना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहावं लागणार आहे. ही अडचण जाणवताच विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा संभ्रमात पडले आहेत. 



तांत्रिक कारण दुरुस्त करण्याचं काम विद्यापीठकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. आजच परीक्षा घेऊ विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा व चिंता करू नये असे विद्यापीठाकडून अखेर स्पष्ट करण्यात आलं.