मुंबई : वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. शुक्रवारी बत्तीस वर्षीय सागर खरे हे पोलीस ठाण्यातील एका रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे यांच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षीय मुलगी असा परिवार आहे. सागर खरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. वरिष्ठांवर जोवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रतिक्रिया सागर खरे यांच्या नातेवाईकांनी दिलाय.