अग्नितांडवात सामान्यांचा बळी तर अधिकाऱ्यांची केवळ बदली
सामान्यांचा जीव जातो आणि अधिका-यांचं मात्र बदलीवर निभावतं... असाच धक्कादायक प्रकार कमला मिलच्या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या बाबतीत समोर आलाय.
मुंबई : सामान्यांचा जीव जातो आणि अधिका-यांचं मात्र बदलीवर निभावतं... असाच धक्कादायक प्रकार कमला मिलच्या दुर्घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या बाबतीत समोर आलाय.
२०१५ साली कुर्ल्यातल्या सिटी किनारा हॉटेलमधल्या आगीच्या दुर्घटनेत आठ जणांचा बळी गेला. महापालिका आयुक्तांनी वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली करून त्यांची लोअर परळमध्ये रवानगी केली. मात्र, सपकाळेंच्या कार्यकाळातच कमला मिलमध्ये नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या रूफटॉपमध्ये भीषण दुर्घटना घडली. आता पुन्हा सपकाळेंची केवळ बदली करण्यात आली आहे.
कुर्ल्यात ८ तर कमला मिलमध्ये १४ जणांचा बळी गेलाय. कुर्ल्याच्या दुर्घटनेनंतर आयुक्तांनी सपकाळेंवर कडक कारवाई केली असती तर कदाचित आजची दुर्घटना टलळी असती.
सामान्यांचे बळी जात असताना अधिका-यांचं केवळ बदलीवर निभावत असल्याचं या घटनेमुळे स्पष्ट झालंय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सामान्य मुंबईकरांच्या जीवाची काहीच पडलेली नाही. त्यांच्यासाठी केवळ एक दुर्घटना असल्याचंच या जुजबी कारवाईवरून सिद्ध झालंय.
मुंबई | अग्नितांडवात सामान्यांचा बळी तर अधिकाऱ्यांची केवळ बदली