Mumbai Water Cut : मुंबईकरांनो होळीला पाणी जपून वापरा! कारण `या` तारखेला पाणीकपात
Mumbai Water Cut : सगळ्यांना वेध लागले आहेत ते होळीचे (Holi 2023)...रंगाचा हा सण सोमवारी 6 मार्चला होळी (holika dahan 2023) आणि मंगळवारी 7 मार्चला धुलीवंदन साजरा करण्यात येणार आहे. अशात मुंबईकरांनो पाण्याचा वापर (Water Cut News) जपून करा. कारण या तारखेला तुमच्या नळाचं पाणी गायब होणार आहे.
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठा (Mumbai news) महत्त्वाची बातमी...देशभरात सोमवारी आणि मंगळवारी रंगाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी 6 मार्चला होळी (holika dahan 2023) आणि मंगळवारी 7 मार्चला धुलीवंदन (dhulivandan date in maharashtra 2023) साजरा केला जाणार आहे. होळी म्हणजे रंगांचा सण...रंगासोबतच पाणीही खेळलं जातं. त्यामुळे मुंबईकरांनो होळीला पाणी जपून वापरा. कारण मुंबईची (bmc news) पूर्व उपनगरे आणि शहरातील काही भागात पाणीकपात करण्यात येणार आहे. (Mumbai Water Cut After Holi 9 march to 11 march water supply news in marathi)
पाणी कपातीमागचं कारण!
मुंबई महानगरपालिकेच्या ठाण्यामधील कोपरी पुलाजवळी जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई 2 जलवाहिनीमधून पाणी गळती होत असलेल्या तक्रारी वारंवार येतं असल्याने पालिका हे काम करणार आहे.
कधी आणि कुठल्या भागात असणार पाणीकपात?
त्यामुळे होळी आणि धुलिवंदनानंतर गुरुवारी 9 मार्च ते शनिवारी 11 मार्चपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमधील काही परिसरात 10 टक्के पाणीकपात होणार आहे. पाणी जपून वापरा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
या परिसरात पाणीकपात
पूर्व उपनगरे
टी विभाग - मुलूंड (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग
एस विभाग - भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग
एन विभाग - विक्रोळी (पूर्व), घाटकोपर येथील (पूर्व) आणि (पश्चिम) विभाग
एल विभाग - कुर्ला (पूर्व) विभाग
एम/पूर्व विभाग - संपूर्ण विभाग
एम/पश्चिम विभाग - संपूर्ण विभाग
ए विभाग - बीपीटी आणि नौदल परिसर
बी विभाग - संपूर्ण विभाग
ई विभाग - संपूर्ण विभाग
एफ/दक्षिण विभाग - संपूर्ण विभाग
एफ/उत्तर विभाग - संपूर्ण विभाग
दर शनिवारी पाणीकपात!
दुसरीकडे ‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या आणि 800 मीटर लांबीच्या जल वाहिनीचे करण्यात येणार आहे. त्यासाठी दर शनिवारी पाणी कपात करण्यात येणार आहे. ही पाणीकपात 6 मे 2023 च्या प्रत्येक शनिवारी होणार आहे. संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरात दर शनिवार पाणीकपात असणार आहे.