Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड परिसरातील असलेली जुनी 1200 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी आता नवीन 1200 मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरु करण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवारी 17 जानेवारी ते गुरुवारी 18 जानेवारीला ई विभागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. (Mumbai Water supply Mumbaikars use water carefully Water supply to this area closed for 24 hours on Wednesday 17 january to Thursday 18 january)


किती वाजेपासून नळाचं पाणी होणार गायब?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतील चर्चगेटपासून मशीद बंदर, भायखळा परिसरात बुधवारी 17 जानेवारी सकाळी 10 वाजेपासून गुरुवारी 18 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. 


'या' भागाला बसणार फटका!


 ए विभाग


 नेव्हल डॉकयार्ड सप्लायअर्तंगत सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत


 ई विभाग


नेसबीट झोन अतर्गंत ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) 
 
म्हातारपाखाडी रोड झोन अतर्गंत म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी  रेल्वे  कुंपण



डॉकयार्ड  रोड  झोन अतर्गंत बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग


हातीबाग मार्ग अतर्गंत हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ  मार्ग 


जे. जे. रुग्णालय कमी दाबाने पाणीपुरवठा 


मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन अतर्गंत मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना 


रे रोड  झोन अतर्गंत बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक 1-3 


माऊंट मार्ग अतर्गंत रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान,  घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा  (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग 


बी विभाग


बाबूला  टँक  झोन अतर्गंत मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली  मार्ग 


डोंगरी बी झोन अतर्गंत नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता 


डोंगरी ए झोन अतर्गंत उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग 


मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन अतर्गंत सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग 


मध्य रेल्वे अतर्गंत रेल्वे यार्ड 


वाडी  बंदर अतर्गंत पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग 


वाडी  बंदर अतर्गंत पी. डिमेलो मार्ग आझाद  मैदान बुस्टींग 


या परिसरातील नागरिकांना 17 आणि 18 जानेवारीसाठी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असं आवाहान बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलंय.