मुंबई : मुंबईकरांना सध्या मोठ्या वातावरण बदलाचा सामना करावा लागतोय. या सर्व वातावरणात मुंबईकरांसाठी आपलं आरोग्य सांभाळण्याचं आव्हान असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. गुजरातकडून धूलिकण घेऊन आलेल्या वा-यांमुळे हवेत मोठया प्रमाणावर धूलिकण साचलं आणि दृश्यमानता कमी झाली. धुळीच्या वादळानं मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानानं मुंबईकरांना हुडहुडी भरवली. 



रविवारी मुंबईचे कमाल तापमान 23.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान आहे. दरम्यान, धूळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत असून, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.