गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात वाकून पाहताना महिला पडली पाण्यात, आणि नंतर
समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवलं, गेटवे ऑफ इंडिया जवळचा धक्कादायक प्रकार
मुंबई: समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ घडला आहे. 20 फूट खोल समुद्रात ही महिला बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महिला समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि एनडीआरएफ यंत्रणा कामाला लागली.
गेटवेवरून समुद्रात वाकून पाहात असताना तोल गेला आणि ही महिला कोसळल्याची माहिती मिळाली आहे. याआधी नुकताच एका महिलेला सेल्फी घेत असताना तोल जाता जाता वाचवल्याचा प्रकार मुंबईत समोर आला होता.
अति उत्साही किंवा जोशाच्या नादात असे प्रकार करायला जाऊ नका. नाहीतर नसतं संकट अंगावर ओढवून घ्याल त्यामुळे काळजी घ्या.
मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात पुढच्या तीन तासात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील देण्यात आलं आहे. राज्यात एकीकडे पावसानं जोर धरला असताना हा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला. महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.