मालाड येथे गुप्ता मार्केटला मोठी आग, ३ दुकाने खाक
मालाड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली.
मुंबई : मालाड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली. मालाड येथील एम. एम. मिठईवाला जवळील गुप्ता मार्केटला ही आग आज सकाळी लागली. घटनास्थळी धुराचे लोट हवेत पसरले होते. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
आगीची घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी धुराचे लोट पसरले होते. आग आता पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमनदलाला यश आले आहे. पण या आगीमुळे आजूबाजूची ३ दुकाने जळून खाक झाली आहेत. चिंचोळ्या गल्लीमुळे आग विझविण्यात अग्निशामक दलाला अडचणीचा सामना करावा लागला. तोपर्यंत या आगीची झळ अन्य दुकांना बसली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. जीवितहानीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.