COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नियमानुसार काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या मोटरमनची प्रशासनासोबत झालेली बैठक निष्फळ ठरलीये. त्यामुळे दिवसभरात ६००च्या वर फेऱ्या रद्द होण्याची शक्यता असून संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल होण्याची भीती आहे. आतापर्यंत १०० फेऱ्या रद्द झाल्यात.


वेळापत्रक कोलमडलंय 


आपल्या विविध मागण्यांसाठी मोटरमननी नियमानुसार काम आंदोलन करत ओव्हरटाईम करायला नकार दिलाय. त्यामुळे मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय.  लाल सिग्नल चुकून पासिंग झाल्यास 24 मोटरमनला सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय तुघलकी असल्याची संघटनेची तक्रार आहे.