Coronavirus in Mumbai : मुंबईकरांनो सावधान व्हा. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. (Mumbai News) एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आली असून पालिका रुग्णालयांत 4 हजार बेड्स अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. नायर, केईएम, सायनसह उपनगरातल्या रुग्णालयात हे बेड्स सज्ज ठेवण्यात आलेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचा कोविड वॉर्ड तैनात ठेवण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईत नव्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. माजी मत्री छगन भुजबळ आणि विद्यामान मंत्री शंभुराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर सर्व बंधने उठविण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा धोका असल्याने गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सध्या 100च्यावर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे.


राज्यात ‘H3N2’चे आठ नवे रुग्ण, रुग्णसंख्या ३४१वर, राज्यात विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात दोन दिवसात कोरोनाचे 6 बळी गेले आहेत. 483 नव्या रुग्णांचं निदान झाले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना केल्या आहेत.


कोरोनासाठी मुंबई सज्ज 


नायर, केईएम, सायन रुग्णालयात 4 हजार बेड्स


खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचा कोविड वॉर्ड तैनात


16 तास वॉर रुम कार्यरत, MBBS डॉक्टर्स तैनात


सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत वॉर रुम कार्यरत


डायबिटीज, ब्लड प्रेशर, डायलिसिसच्या रुग्णांना मार्गदर्शन 



नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवले


ओमिक्रानच्या नव्या व्हेरिएंटने देशाचे टेन्शन वाढवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. भारतात सर्वात जास्त आढळणारा XBB.1.16 व्हेरिएंट हा ओमिक्रॉनचाच एक प्रकार आहे. 


या विषाणूने इतर सर्व विषाणूंना कमकुवत करत स्वत: वर्चस्व गाजवलंय.. इतकंच नाही तर हा विषाणू सध्या अधिक वेगाने पसरतोय.. तो धोकादायक होऊ नये यासाठी सर्व देशांनी तयारी पूर्ण करावी असं आवाहन WHO ने केलंय. जगातल्या अनेक देशांतही कोरोनाची प्रकरणं वाढतात आहेत. अमेरिका आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे