मुंबई : चार तासात अतिवृष्टी झाली आणि मुंबईची दैना उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. तसेच रेल्वे सेवा पावसामुळे ठप्प पडली आहे. त्यामुळे दळणवळाची साधन नसल्याने अनेक जणांना घरी जाता आलेले नाही. अशा पावसात अडकलेल्या लोकांना मुंबईकरांनी मदतीचा हात पुढे केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे अनेकांची  घराकडे जाण्याची गैरसोय  होत आहे. काही जण रेल्व स्थानात अडकले. काही जण ऑफिसमध्ये आहेत. तर काही जण रस्त्याच्याकडेला आहेत. त्यांनी काळजी करु नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी मदतीच्या ठिकाणी पोहोचावे, असे आवाहन करण्यातआले आहे.


- मंदिर संस्था पुढे आल्यात. सिद्धीविनायक मंदिर, पोर्तुगीज चर्च या ठिकाणीही सोय करण्यात आलेय. प्रभादेवी, शिवाजी पार्क, श्री सिद्धीविनायक मंदिर येथे अन्न आणि पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष आदेश बांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी केलेय. - संपर्क क्रमांक 022 24224438, 022 24223206



-  तसेच दादरच्या जवळपास अनेक लोकांना आपल्या घरी सुखरूप पोहोचणे कठीण झाले आहे. या सर्व बांधवांना आपत्कालीन मदतीसाठी हात पुढे करण्यात आलाय. अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण हॉल लक्ष्मीनारायणबाग,  बाल गोविंददास  रोड, माहीम, मुंबई येथे व्यवस्था केलेय. - संपर्क प्रभाकर  कुलकर्णी 9820619586 


- मुसळधार पावसामुळे अडकलेल्या मुंबईकारांसाठी तात्काळ जेवणाची आणि नाश्त्याची  व्यवस्था लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने केली आहे. लालबागचा राजा मेन गेट समोरील मदत कक्षात ही व्यवस्था केली आहे.'


- मुंबईला मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे, काही ठिकाणी वाहतूक बंद आहे. आपल्या संबंधित कोणी पावसात अडकलं असेल, तर त्यांना पुढीलपैकी कोणत्याही ठिकाणच्या जवळच्या चर्चमध्ये जायला सांगावे. मुंबईतल्या फादरांनी तशी व्यवस्था केली आहे, असे जॉन जे. कोलाको यांनी कळवले आहे. दादर येथील पार्तुगीज चर्चमध्ये फादर जॉन रुमाव यांच्याशीसंपर्क साधावा.


- वरळीतील सेक्रेड हार्ट येथे फादर पिटर डिमेलो यांच्याशी संपर्क साधावा.गोरेगाव सेमनेरी आणि अंधेरी चार बंगला चर्चसाठी फादर प्रकाश रुमाव यांच्याशी 9764974914 या क्रमांकावर 
संपर्क साधावा.


- डहाणूकर वाडी, कांदिवली येथील अॅझम्प्शन चर्च अँड स्कूलआणि  वांद्र्याच्या माउंट मेरी चर्चच्या समोर डायोसेसन पॅस्टोरल सेंटरइथेही अडकलेल्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था 
करण्यात आली आहे. तिथे फिट्झेरल्ड यांच्याशी संपर्क साधावा.


- चित्रा सिनेमासमोरचा दादर गुरुद्वारा निवास आणि अन्नपाणी पुरवत आहे. मुंबईत कोणत्याही ठिकाणच्या गुरुद्वारा साहिबमध्ये अन्न आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे, असं कळवण्यात आलं आहे.



- मनप्रीत सिंह खालसा यांच्याशी ९३२३५६१५५५ आणि हरनीत सिंह खालसा यांच्याशी ९०२२२७२२५२ या क्रमांकावरसंपर्क साधावा.


- दादर, माटुंगा, सायन, परळ या भागांमध्ये अडकलेल्यांनी वडाळ्यातल्याराम मंदिर मार्गावरील जीएसबी गणेशोत्सव मंडपात जावे, तिथे अन्नपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे निमंत्रक सुभाष पै (9821595432 / 8879114932) यांनी कळवलं आहे.


- जी मंडळी फोर्ट भागात अडकली असतील, त्यांनी व्हीटी स्टेशनजवळ बोरा बाजार मार्गावर श्री फोर्ट जैन संघामध्ये जावे.


- माटुंगा, माहीम, सायन, दादर भागात अडकलेल्यांनी माटुंग्याच्यालक्ष्मीनारायण लेनमधील शगुन हॉलमध्ये जावे. तिथे राहण्याचीआणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


- वांद्रे, खार, सांताक्रूज, माहीम, सी लिंक या भागात अडकलेल्यांनी लिंकिंग रोडवरील अमरसन्सजवळ तृप्ती भंडारा येथे जावे. तिथे चहापाणी, भोजन यांची व्यवस्था करण्यात आली आहे.