मुंबईकरांनो लोकलने प्रवास करताना फटका गँगपासून सावधान...
लोकलने प्रवास करताना सावध...
मुंबई : तुम्ही मुंबईत राहात असाल आणि लोकल प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे.... तुमची एक चूक तुम्हाला महागात पडेल.... कारण फटका गँगची तुमच्यावर नजर आहे. लोकलमधून प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
लोकलच्या दारात उभं राहू नका
रेल्वे ट्रॅकवरच्या खांबांवर फटका गँगचे गुंड बसलेले असतात. ते त्यांचं सावज शोधत असतात. तुम्ही दारात उभं राहून मोबाईलवर बोलताय किंवा मोबाईल पाहताय, तर तुमचा मोबाईल गेलाच म्हणून समजा.... या फटका गँगनं मुंबईत पुरता धुमाकूळ घातलाय.... मोबाईल चोरीच्या त्यांच्या वेगवेगळ्या आयडिया आहेत.
मोबाईल खिशात ठेवताय ?
तुम्ही मोबाईल शर्टच्या खिशात ठेवलाय...... तेवढ्यात गाडी येते.... तुमचं लक्ष गाडीकडे जातं आणि गर्दीचा फायदा घेत फटका गँगवाला तुमचा मोबाईल अलगद लंपास करतो..
मोबाईल पँटच्या खिशात ठेवलाय...?
तुम्ही मोबाईल पाहात असता.... तेवढ्यात गाडी येते, तुम्ही मोबाईल पँटच्या खिशात ठेवता.... तुमचं लक्ष गाडीकडे असतं.... आणि तुम्ही चढण्याच्या घाईत असता, त्याचाच फायदा घेऊन अलगद फोन चोरला जातो.
दारात असताना मोबाईल हातात आहे ?
तुम्ही दारात उभं राहून मोबाईल पाहात असता, स्टेशन येतं... उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी गर्दी होते. त्याचाच फायदा घेऊन फटका गँगवाला फोन लंपास करतो.
फेब्रुवारी २०१८ पासून फटका गँग मुंबईत धुमाकूळ घालते आहे. कोरोना काळातही फटका गँग सक्रिय होती. वडाळा, मानखुर्द, टिळकनगरमध्ये फटका गँगविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
फटका गँगच्या मुसक्या आवळायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. रुळांजवळच्या झोपड्यांमध्ये जाऊन शोधाशोध केली जातेय. पण तुम्ही सावध राहा.... ट्रेनमधून उतरताना पायदान आणि फलाटामधल्या अंतराकडे ठेवाच.... पण त्याबरोबरच मोबाईलवरही लक्ष ठेवा.
फटका गॅंग विरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे असं असलं तरी रेल्वे प्रवाश्यांनी ही अधिक सतर्क आणि जागरूक राहील पाहिजे महत्वाचे म्हणजे लोकल च्या दरवाजात उभं राहून प्रवास टाळला पाहिजे.