Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला `या` भागात 100 टक्के पाणी कपात
Mumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Mumbai Water Cut: मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीपकपातीचा सामना करावा लागणार आहे. सध्या वातावरण देखील उकाड्याचं असून अशा परिस्थितीत पाणी कपात होणार असल्याचने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी वांद्रे पूर्वसह धारावीच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही भागांत २५ टक्के पाणीकपात होणार आहे. अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
'या' भागात पूर्णपणे राहणार पाणी बंद
याचा मुख्य फटका वांद्रेतील पूर्व भागात राहणाऱ्या रहिवाशांना होणार आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यशिवाय धारावीच्या काही भागात 25 टक्के पाणीकपात होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पाइपलाइन जोडण्याचे काम केले जाणार आहे. तब्बल 18 तास हे काम होणार असल्याची माहिती आहे.
18 एप्रिल 2024 आणि शुक्रवार, 19 एप्रिल रोजी वांद्रे पूर्वेकडील वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे स्टेशन परिसरात पाणी येणार नाहीये. धारावीमध्ये 18 एप्रिल रोजी जी नॉर्थ वॉर्डातर्गत धारावी लूप रोड, नाईक नगर, प्रेम नगर या भागात सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय 18 एप्रिल रोजी धारावीतील गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग परिसरात संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती आहे.
'या' ठिकाणी 25 टक्के होणार पाणी कपात
धारावीच्या 60 फूट रोड, सायन-माहिम लिंक रोड, 90 फूट रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कय्या मार्ग, एकेजी नगर आणि एमपी नगरमध्ये गुरुवारी 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 25% पाणीकपात होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय.