CSMT Railway Station: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लोकलमधून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे तर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. सीएसएमटी स्थानक हे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आता याच सीएसएमटी स्थानकाचा कायापालट होणार आहे. सीएसएमटी स्थानकाचा पुर्नविकास केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारताचे ऐतिहासिक वारसा असलेले स्थानक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या स्थानकाची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, वारसादेखील जपला जाईल आणि स्थानकात आधुनिक सुविधाही देता येतील. स्थानकाची रचना ही जगभरातील उत्कृष्ट कलाकारांची आणि स्थानिक लोकांची मदत घेऊन करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत आहे. स्थानकाच्या पुर्नविकासात स्थानकात प्रवाशांना वेटिंग हॉलचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त असलेले स्थानकामुळं प्रवाशांना प्रवास करताना अडचण येणार नाही.


भारतीय रेल्वे अमृत भारत स्थानक योजनेंतर्गंत रेल्वे स्थानकांचा कायापालट करणार आहे. लाखो नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. शानदार प्लॅटफॉर्म, कियोस्क, फूड कोर्ट, शॉपिंग मॉल आणि मुलांना खेळण्यासाठी प्ले एरियासारख्या सुविधा असणार आहेत. 


मुंबई लोकल हा मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेची क्षमता आणखी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. 301 किमीचे नवे रूळ बसवण्यात येणार आहेत. एकूण 12 प्रकल्पासाठी 16,240 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. 2025,2026 आण 2027 मध्ये प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळं लोकलच्या क्षमतेत वाढ होणार आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे. 


दररोज 3200 लोकल सध्या धावत आहेत. आता जवळपास 300 ट्रेन वाढवण्यात येणार आहेत. ट्रेनच्या तंत्रज्ञानावरही भर दिला जाणार आहे. कवच - कवच 5.0 ची नवीन आणण्यात येणार आहे. ट्रेन कंट्रोल टेक्नॉलॉजीमध्ये सादर केली जाणार आहे. मेट्रो, कोस्टल रोड आणि लोकलची संख्या वाढवण्यात येणार आहे, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.