मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेचे कंत्राटी सफाई कामगार काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करत असलेल्या मुंबईकरांना आता कचरा संकटाचा सामना देखील करावा लागणार आहे. मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेच्या मुख्यालयाबाहेर कचरा उचलणाऱ्या गाड्यांची रांग दिसत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स, मास्क, जोखीम भत्ता मिळावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 



केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार या कामगारांना विमा सुरक्षा कवचदेखील दिले जात नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कर्मचारी अस्वस्थ आहेत. अनेकदा मागणी करून, निवदने देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांना हा मार्ग अवलंबावा लागला आहे.