मुंबई : गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली. आगीचं कारण अद्यापही असप्ष्ट आहे. सध्याच्या घडीला आगीचं स्वरुप आणि धुराचे प्रचंड लोट पाहता ही आग मार्केट इमारतीच्या बहुतांश भागात पसरल्याचं कळत आहे. आगीचं हे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या जवळपास ८- १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं कळलं. त्याचवेळी तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. असं असलं तरीही आग इतक्या भीषण स्वरुपानं पसरत गेली की आगीच्या विळख्यात मार्केटमधील अनेक दुकानं आल्याचं म्हटलं जात आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या चार गाळ्यांना ही आग लागली ज्यानंतर ती वेगानं परसरल्याचं म्हटलं जात आहे. ही आग लेवल 2 म्हणजेच मध्यम स्वरुपाची असल्टी माहिती समोर येत आहे. 


अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून, त्यांना बऱ्याच अंशी यशही मिळालं आहे. या आगीत सौंदर्य प्रसाधनं आणि स्टेशनरी साहित्याच्या १० - १५  दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे.


मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या या मार्केट परिसरात गुरुवारी तुलनेने गर्दी कमी होती. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लकडाऊनच्या काळानंतर सुरु झालेल्या अनलॉकमध्ये हे ठिकाण पूर्वपदावर येत होतं. पण, आग लागल्याच्या घटनेनं त्या ठिकाणी एकच गोंधळ आणि भीती पाहायला मिळाली.