मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरे आणखी जोरात धावू लागणार आहे. कारण एमयूटीपी तीन या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मुंबई, वेगाची राणी आता आणखी सुपरफास्ट होणार आहे. मुंबई महानगराच्या लोकल सेवेचा चेहरामोहरा बदलवणारा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमयुटीपी - ३ प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


या प्रकल्पाअंतर्गत हे नवीन मार्ग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- सीएसएमटी-पनवेल जलद उन्नत ५५ किलोमीटरचा मार्ग, प्रकल्प किंमत १२,३३१ कोटी रुपये


- पनवेल - विरार ७० किमी लांबीचा उपनगरीय मार्ग 


- हार्बर मार्गाचं बोरीवलीपर्यंत विस्तार 


- बोरीवली - विरार दरम्यान ५ वा आणि ६ वा मार्ग 


- कल्याण - आसनगाव दरम्यानचा ३२ किमीचा नवा मार्ग 


- कल्याण - बदलापूर दरम्यान १४ किलोमीटरचा ३ रा आणि ४ था मार्ग 


- २१० वातानुकुलित लोकल ट्रेन्स 


एमयुटीपी - ३ ए च्या प्रकल्पांना केंद्राने अर्थसंकल्पात जरी तत्वतः मान्यता दिली असली तरी त्याबाबत तरतूद मात्र केलेली नाही. आता राज्य सरकारने या प्रकल्पाचा आर्थिक हिस्सा उचलायला मान्यता दिली असल्याने हा महत्वकांक्षी प्रकल्प खऱ्या अर्थाने पुढे सरकणार आहे.