मुंबई : वाढदिवस हा खरं तर सेलिब्रेट करण्याचा दिवस... पण हाच वाढदिवस आयुष्याचा अखेरचा दिवसही ठरू शकतो. खुशबु बन्सलच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. वन अबोव्ह रेस्टॉरंटमध्ये ती वाढदिवस साजरा करायला गेली... ती पुन्हा परतलीच नाही.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुशबू... हसत हसत केक कापत आपला वाढदिवस साजरा करत होती. रात्री १२च्या ठोक्याला २८ व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यासाठी ती वन अबोव्ह रेस्टॉरंटमध्ये आली. सोबत तिचे पती, नणंद आणि मैत्रिणी देखील होत्या.


पार्टी ऐन रंगात आली असताना तिच्या आईचाही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. आईनं १२ वाजून ५ मिनिटांनी खुशबूला फोन केला. तिला  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लवकर घरी ये असंही आवर्जून सांगितलं. पण खुशबू पुन्हा घरी येऊ शकली नाही.


पार्टी ऐन रंगात आली असतानाच अचानक भीषण आग लागली. सगळीकडे पळापळ सुरु झाली. बाहेर पडण्याचा मार्ग कुणालाही दिसेना. सगळीकडे आगीचे लोळ आणि धुराचं साम्राज्य. खुशबू, तिच्या मैत्रिणी कविता धारिणी आणि तेजल गांधी या तिघीही त्या अग्नितांडवात सापडल्या. तिघींचाही त्या अग्निप्रलयात दुर्दैवी अंत झाला. 


खुशबूचा नवरा हा आगीत गंभीर जखमी झालाय. यामुळं खुशबूच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.


खुशबूच्या खेतवाडीतल्या घरात आज तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन होणार होतं. पण श्रीपती टॉवरमधल्या तिच्या राहत्या घरातून खुशबूची अंत्ययात्रा निघाली...  आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची खात्री यानिमित्तानं पुन्हा आली.



मृत्युपूर्वी केलं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन