दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु झालेली रुग्णवाढ नव्या वर्षाच्या सुरुवातीला वेगाने वाढतेय. राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याची तयारी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२२ हे निवडणूकीचं वर्ष आहे. यंदाच्या वर्षात राज्यात 10 महापालिका (MAHARASHTRA MUNICIPAL ELECTIONS 2022) आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणूका (local body election maharashtra) होऊ घातल्या आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, उल्हासनगर, अमरावती, सोलापूर, अकोला या दहा महापालिकांचा समावेश आहे. 


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगान तयारी सुरु केली आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 2020 मध्ये कोरोनामुळे राज्य सरकारने नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबवली या महापालिकांची निवडणूक पुढे ढकलली होती


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको
दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका नको अशी राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने तसा ठरावही विधिमंडळात केला आहे. एकीकडे निवडणुका पुढे ढकलण्यावरून राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असताना निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केलेली आहे.


वॉर्ड रचनेचं काम सुरु
महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या संख्येत वाढ झाल्याने वॉर्ड रचनेचे काम निवडणूक आयोगाने सुरू केलं असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.