Mumbai Political News : मुंबई महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ
Mumbai Political News : मुंबई महापालिकेत (BMC) स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विधानसभेत विधायक मंजूर करण्यात आले आहे. आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे. महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक 2023 विधान सभेत मंजूर करण्यात आले आहे.
Mumbai Political News : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे. (Nominated Councillors ) मुंबई महापालिकेत (BMC) आत्तापर्यंत पाच स्वीकृत नगरसेवक संख्या होती ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांत नाराज असलेल्या आणि इच्छुक असूनही तिकीट न मिळेल्या व्यक्तीला मुंबई पालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) आता नगरसेवक पदाची लॉटरी लागणार आहे. (Mumbai Politics News)
मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विधानसभेत विधायक मंजूर करण्यात आले आहे. (Bill Approved to increase nominated councillors in BMC) आता स्वीकृत नगरसेवकांची 10 होणार आहे. महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक 2023 विधान सभेत मंजूर करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील 236 नगरसेवकांव्यतिरिक्त स्वायत्त 10 नगरसेवक नियुक्त करता येणार. या आधी 227 नगरसेवकांव्यतिरिक्त केवळ 5 स्वायत्त नगरसेवक नेमता येत होते. दरम्यान, स्वायत्त नगरसेवकांना महापौर आणि इतर समित्यांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.
राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) नामनिर्देशित नगरपरिषदांची संख्या विद्यमान पाच वरुन 10 करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित नगरपरिषदांची संख्या जास्तीत जास्त 10 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने जानेवारी 2023 मध्ये मंजूर केलेल्या विधेयकाचे वाचन करताना म्हटले, 'महामंडळांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा' करण्यासाठी हा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, महापालिका प्रशासनातील ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तीला राज्यातील महापालिकांच्या अधिक प्रभावी प्रशासनासाठी नगरसेवक म्हणून नामनिर्देशित केले जाते. नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करुन कॉर्पोरेशनच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून, नामनिर्देशित सदस्यांची संख्या वाढवणे हितावह आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या मुंबई पालिकेवर प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुदत होऊनही अद्याप निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक न होता पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर राज्य सरकारचा प्रभार दिसून आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची कित्येक वर्ष सत्ता आहे. सध्या पालिकेवर प्रशासक आहे. मुंबई पालिकेतून ठाकरे गटाला हद्दपार करण्यासाठी किंवा त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा आहे.