मुंबई : राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात येणार आहे. मराठी भाषा सक्तीचे हे विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं आहे. त्यामुळे यापुढे राज्यात मराठी अनिर्वाय झाली आहे. दहावीपर्यंतच्या सर्व शाळांत आता मराठी भाषा बंधनकारक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी भाषा सक्तीचं हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं. मराठी भाषा सक्तीची करण्याची वेळ का आली? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकली, म्हणून टीका झाली. कोणत्याही भाषेचा दुस्वास करणं मला शिकवलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


मराठीचं बाळकडू मला लहानपणीच मिळालं होतं. माझी मुलं उत्तम मराठी बोलतात. मला कर्नाटकमध्ये जशी कानडीची सक्ती आहे, तशी मराठीची सक्ती करायची नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.