मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सेट अखेर काढायला सुरवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील ५ महिन्यांपासून हा सेट इथेच उभारून ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच हे मैदान वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. 


मात्र २ महिने उलटले तरी सेट तसाच होता.  अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका आहे. मात्र त्याचं चित्रीकरण अजूनही सुरु झालेलं नाही. असं असताना हा सेट मैदानावर अडचण ठरत होता. 


यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं मंजुळे यांना हा सेट तात्काळ काढून टाकण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला होता. 


या पार्शवभूमीवर नागराज मंजुळे यांनी स्वतःच हा सेट काढून घेण्यास सुरवात केलीय. चित्रपटाचं चित्रीकरण अनिश्चित काळासाठी लांबल्यानं सेट काढत असल्याचं त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलंय.