लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा नवरा, बायको भांडायची म्हणून केली प्रेयसीची हत्या
Naigaon Crime: नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार: लग्न झाले असूनही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नात्याचा शेवट अखेर धक्कादायक झाला. यामध्ये प्रेयसीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. नायगावमधून ही घटना समोर आली आहे. बायकोसोबत रोज होणाऱ्या भांडणाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असणारी प्रेयसी कारणीभूत असल्याचे त्याला वाटले. या रागातून ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची.
तेथेच काम करत असलेला कॉस्ट्युम डिझायनार मनोहर शुक्लासोबत तिचे प्रेमसंबंध जुळून आले होते. मात्र मनोहर विवाहित असल्याने नेना वरून मनोहर आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतं होती.
त्यामुळे नेनाचा विषय कायमचा संपविण्यासाठी मनोहरने नेनाची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने प्लानिंग सुरु केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि वापी परिसरात फेकला अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
मयत नेना आणि मनोहर या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मनोहरने आपल्याशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. पण आधीच लग्न झाल्याने मनोहर यासाठी राजी नव्हता. पण तिने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता.त्यातून नेनाची हत्या केल्याचा आरोप मयत नेनाच्या बहिणीने केला आहे.
पोलिसांनी आरोपी मनोहर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या
दुसऱ्या एका घटनेत पुण्यात पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दाम्पत्याला एक सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीन हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे.
लोहगावमधील संतनगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. स्वप्नील बाळासाहेब खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर पतीने संशय आला म्हणून पतीचा खून केल्याचे समोर आलं आहे.