डान्स हा अनेकांचा आवडता छंद आहे. डान्स, नृत्य हा फक्त छंद नाही तर हा काहींचा पैसा मिळवण्याचा मार्ग आहे. या खेरीज डान्स हा एक उत्तम व्यायामाचा प्रकारही आहे. भारतात डान्सचे अनेक प्रकारही आहे. आपल्या देशात अगदी प्रत्येक राज्याचा आपला स्वतःचा डान्सचा प्रकार आहे. अशा वेगवगेळ्या डान्सचा तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभव घेयाचा आहे? तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज आहे. तुम्ही अनेक डान्स प्रकार मुंबईतच अनुभव शकता. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) नक्षत्र नृत्य महोत्सव घेऊन आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा महोत्सव भारतीय शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरेला साजरा करण्यासाठी असतो. समूह नृत्यदिग्दर्शनाच्या सामर्थ्यावर या महोत्सवात प्रकाश टाकेल. यात मोहिनीअट्टम, कथ्थक, भरतनाट्यम, कथकली, मयूरभंज छाऊ नृत्य अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले जाईल.


कधी सुरु होणार महोत्सव? 


3, 6 आणि 26 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतल्या  नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात एनसीपीए येथे असणार आहे. 


एनसीपीएच्या  नृत्य प्रमुख डॉ. स्वप्नकल्पा दासगुप्तायावर यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "नक्षत्र हा सामूहिक नृत्यातून दाखविल्या जाणाऱ्या 'एकत्रित्वाच्या' सामर्थ्याचा उत्सव आहे. या वर्षीच्या महोत्सवात सामाजिक-सांस्कृतिक परिमाणे शोधून काढणारे कार्यक्रम सादर केले जातात, विचारांना पुरेसा आहार मिळतो. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक आणि कलाकारांच्या कलाकृतींद्वारे प्रेक्षकांना आमच्या नृत्य वारशाची खोली आणि सौंदर्य अनुभवण्याची संधी आहे.”


कसं आहे शेड्युल? 


> एक्सपेरीमेंटल थिएटर- 3 ऑक्टोबर 
मोहिनीअट्टम -  डॉ. नीना प्रसाद आणि मंडळाचे 'कुरीयेदाथु थात्रीची कथा' 
कथ्थक -  पंडिता शमा भाटे यांचे नादरूप "समन्वय" 


> जमशेद भाभा थिएटर- 6 ऑक्टोबर 
कथ्थक- कुमुदिनी लखियाच्या कदंब सेंटर फॉर डान्सचे "अताह किम" 
भरतनाट्यम- गीता चंद्रन आणि नाट्यवृक्ष डान्स कलेक्टिव द्वारे "प्रवाहती: द फोर्स फॉरवर्ड"


> जमशेद भाभा थिएटर -26 ऑक्टोबर 
कथ्थक- "द गेम ऑफ डाइस" (कथकली, मयूरभंज छाऊ, मार्शल आर्ट्स) संतोष नायर आणि मंडळ सादर करणार आहेत निरुपमा आणि राजेंद्र आणि अभिनव डान्स कंपनीचे "बहुरंग".