प्रथमेश तावडे, झी मीडीया, मुंबई : नालासोपाऱ्यात एका 26 वर्षीय तरुणाने लोनवर घेतलेल्या स्कुटीचे हफ्ते भरता न आल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल बाबुराव सकपाळ असं या तरुणाचे नाव आहे.  राहुलची आई भ्रमिष्ट असून ती दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. तर त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्यामुळे तो नालासोपाऱ्याच्या तुळींज परिसरात एकटा राहत होता. राहुल हा नाटकात छोटी मोठी कामे करत होता.तसेच वर्तमानपत्र विक्रीसाठी कुपन स्कीमच काम करत होता. त्याने स्कुटी घेण्यासाठी 60हजारांचे कर्ज काढले होते. मात्र कोरोनामुळे आलेली बेरोजगारीमुळे त्याच्या स्कुटीचे हफ्ते थकले. त्याला बँकेच्या रिकव्हरी एजेंट कडून हफ्ते भरण्यासाठी तगादा लावला होता.


त्यासाठी त्याने मित्रांकडून पैसे घेतले होते मात्र त्याची फेड करता येत नसल्याने नैराश्यात जाऊन राहुलने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपविले.पैसे फेडण्यासाठी त्याने मित्रांकडून 74 हजार घेतले होते. कर्ज फेडता न आल्याने टोकाचे पाऊल उचलले.


 पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला आहे. या घटनेची तुळींज पोलीस ठाण्यात आकस्मित नोंद करण्यात आली आहे. 
आत्महत्येआधी  सुसाईड नोट मध्ये सर्व हकीकत लिहिली होती.