नालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार
Nalasopara Crime: बोगस डॉक्टर मागील 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत
Nalasopara Crime: बोगस डॉक्टरमुळे रुग्णांच्या जीवाला धोका तर असतो. त्यामुळे यांना वेळीच रोखणे गरजेचे असते. दरम्यान एका बोगस डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे नालासोपारा येथे खळबळ उडाली आहे. बोगस डॉक्टर 22 वर्षीय तरुणीवर उपचार करत होता. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळीच खिचडी शिजू लागली होती. त्याने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला. उपचाराच्या नावाखाली त्याने रुग्ण तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बाबासाहेब पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. नालासोपारा पश्चिमेच्या छेडा नगर मधील गौरव गॅलक्सी इमारतीत बाबासाहेब पाटील याचा दवाखाना आहे.
22 वर्षीय तरूणी मुळव्याधीच्या उपचारासाठी बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात आली होती. त्यावेळी पाटील याने तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. तरुणीने नकार देताच त्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने दिला आहे.
बोगस पदवी
बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम 376) आणि विनयभंग (कलम 354) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पाटीलबद्दल आणखी माहिती उघडकीस आली. पाटील हा डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसल्याचा प्रकार समोर आला. असे असतानाही पाटील हा आपण वैद्य असल्याचा दावा करत होता. 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग
दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या वॉशरुममध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न करण्यात आला. ही महिला वकिल असून याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे. पीडित महिला कार्यालय असलेल्या लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले नाही. ही घटना गुरुवार सकाळी 8 च्या सुमारास फोर्ट परिसरातील लोकमंत्य टिळक मार्गावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडला, जिथे पीडितेचे कामाचे ठिकाण आहे. 35 वर्षीय पीडित महिला वकील असून दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफीस आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास ही महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन वॉशरमध्ये गेली होती.त्यावेळी टॉयलेटमध्ये एक 21 वर्षांचा तरुण उपस्थित होता. महिलेने त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने बाहेर जाण्याचे नाटक केले, पण जेव्हा महिला शौचालयात गेली तेव्हा तो आरोपी पुन्हा आला.महिला टॉयलेटमधून बाहेर आली असता आरोपी तीला बाहेर असल्याच दिसल. आरोपींनी दरवाजा आतून लावून घेतला होता. त्यानंतर आरोपीने महिलेचा विनयभंग केला आणि नंतर तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर त्याने महिलेच्या पोटावर लाथ मारली आणि तो पसार झाला, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.