प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा : नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षकांच्या दालनातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सखाराम भोये, वय वर्ष (४२)असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हवालदार पदावर कार्यरत होते. नेमकी त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरून केली हे अद्याप अस्पष्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नालासोपारा पूर्वे रेल्वे स्थानक परिसरात तुळींज पोलीस ठाणे आहे. काल मध्यरात्री तीन ते चार वाजताच्या दरम्यान पोलीस हवालदार यांनी  वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातील रेस्ट रूम मध्ये जाऊन स्वतःवर गोळी  झाडून आत्महत्या केली.  या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत संपूर्ण पोलीस ठाणे अनभिज्ञ होते. 


जेव्हा सकाळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात महिला सफाई कर्मचारी साफसफाई गेली त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सखाराम भोये यांच्या आत्महत्येच नेमकं कारण अद्यापही असपस्ट असले तरी पोलीस ठाण्यातच केलेल्या आत्महत्येने ते  मानसिक तणावात होते का? किंवा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



गेल्या चार वर्षपासून पालघर पोलीस दलात सखाराम भोये कर्तव्य बजावत होते. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पाश्चात मुलगा मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.