मुंबईतील मोजोस पब आगीतील मृतांची नावे
कमला मिल कंपाऊंटमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. आगीत १५ पैकी १२ महिलांचा मृत्यू झालाय.
मुंबई : कमला मिल कंपाऊंटमधील ट्रेड हाऊस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मोजोस पबला भीषण आग लागली. या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २० जण जखमी झालेत. आगीत १५ पैकी १२ महिलांचा मृत्यू झालाय.
जखमींना केईएम, भाटीया आणि ऐरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग इतकी मोठी होती की इमारतीच्या गच्चीवर बांधण्यात आलेले बांबू आणि प्लास्टिकचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.
या आगीतील मृतांची नावे :
प्रीती राजानी,
तेजल गांधी,
कविता धोरानी,
किंजल शहा,
प्रमिला केनिया,
शेफाली जोशी,
पारुल,
खुशबू,
मनीषा शाह,
प्राची शाह,
प्राची खेतान,
यश ठक्कर,
सरबजित परेडा,
धैर्य ललानी,
विश्व