नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी? विधानसभा अध्यक्षपदी कुणाची वर्णी?
तीन नेत्यांच्या नावाची चर्चा मात्र कुणाचं पारडं जड होणार?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव अखेर निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झालं आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यानं विधानसभा अध्यक्षपदासाठी आता कुणाची वर्णी लागणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये चाचपणी सुरू झाली आहे. संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. त्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठांनी नाना पटोले यांचं नाव निश्चित केलं आहे. येत्या काही दिवसांत त्यांची अधिकृत घोषणा होऊ शकते. जर नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद कुणाला द्यायचं याबाबत सद्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वारपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळाली आहे.
संग्राम थोपटे पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. थोपटे यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसी म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; नव्या आरोपांवर स्पष्टीकरण
सुरेश वारपूडकर हे परभणी जिल्हय़ातील पाथरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. सुरेश वारपूडकर हे परभणीतून 1998-1999 मध्ये खासदार म्हणूनही राहिले होते.
अमीन पटेल हे मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून आमदार आहेत. अमीन पटेल तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केलं आहे.